मेटरनिख, क्लेमेन्स व्हेंट्सल
मेटरनिख, क्लेमेन्स व्हेंट्सल : (१५ मे १७७३–११ जून १८५९). ऑस्ट्रियाचा चॅन्सेलर (१८०९–४८) व प्रसिद्ध यूरोपीय मुत्सद्दी. त्याचा जन्म ऱ्हेनिश सरदार घराण्यात कॉब्लेन्ट्स (ट्रायर) गावी झाला. फ्रेंच राज्यक्रांतीच्या धुमश्चक्रीत त्याला शिक्षणासाठी अनेक वेळा स्थलांतर करावे लागले, सुरवातीच्या काळात तो श्ट्रौसबेर्क विद्यापीठांत विद्यार्थी होता.